Avari Dedicated to Late General Mancharsha Rustomji Avari
(29-05-1898 to 01-07-1974)
Veteran Freedom Fighter.
Leader of masses having suffer 14 years in British jail for Indian independence.
B.E. (Mech-Engg)

विचारमंचने केलेल्या कार्याच्या नोंदी

१) लोकनेते स्व. जनरल मनचरशा आवारी यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त १ जुलै १९९८ ला विचारमंच व दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र सिविल लाइन, नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गांधीवादी व गांधीजींचे अनुयायी स्व जमनालालजी बजाज (वर्धा) यांच्या सुपुत्री स्व. श्रीमती मदालसा बेन नारायण ह्या आपले क्षेत्र सन्यास व्रत सोडून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. ह्याप्रसंगी घेण्यात आलेल्या लोकनेते स्व. जनरल मनचरशा आवारी यांचे जीवनावर चित्रकला प्रदर्शनी व भारतातील स्वातंत्र्य संग्राम आंदोलनातील महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादींचे सहभागाबद्दल भव्य चित्रकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जे १५ ऑगस्ट १९४७ साली जन्मले व ज्यांनी ५१ व्या वर्षात पदार्पण केले. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांचा हस्ते करण्यात आला.




२) सन १ जुलै २००६ ला लोकनेते जनरल मंचरशा आवारी यांच्या पुण्यतिथि निमित्य मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील, माजी राज्यपाल, राजस्थान यांचे हस्ते निशुल्क चष्म्यांचे वितरण व पद्मश्री डॉ. महात्मे आईबैंक द्वारा गोरगरिबांची निशुल्क नेत्र तपासणी करुन मोतिबिंदुचि शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात आले.


३) सन १४ आगस्ट २०१२ ला लोकनेते जनरल मंचरशा आवारी विचारमंच व राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था नागपुर द्वारा संचालित कर्णबधीर विद्यालय सोनेगाव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मा. श्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी निशुल्क ६ द्विमजली पलंग व अभ्यासिका टेबलचे वितरण करण्यात आले.

४) सन २०१२ मध्ये छोटी खदान हंसापुरी येथे बेरोजगारांचे मेळावे व एम्प्लॉयमेंट कार्ड काढून वितरण व बेरोजगारांना उद्योगधंद्यांचे मार्गदर्शन शासकीय कार्यालयामार्फत व विचारमंचच्या सहकार्याने करण्यात आले.

५) सन १ जुलै २०१३ ला जनरल मंचरशा आवारी यांच्या पुण्यतिथि निमित्य विचारमंच व राजेंद्र हायस्कूल यांचे संयुक्त विद्यमाने मोईल द्वारा अपंगांना जीवनभर चालणारे स्टीलचे कृत्रिम पायाचे वितरण समारोह श्री. के. के. पाठक, माजी पोलिस आयुक्त, नागपुर शहर यांचे हस्ते करण्यात आले.

६) सन ३१ जुलै २०१३ विचारमंच व एम.पी. एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित श्री राजेंद्र हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय नंदनवन येथे संयुक्त विद्यमाने कर्करोग ( कैंसर ) जनजागृतीचे निदान व उपचारावर परिसंवाद शिविर तद्न्य डॉक्टरांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

७) २०१४ मध्ये "ऐ मेरे वतन के लोगो" ह्या अजरामर गीताचे गीतकार कवी प्रदीप फाउंडेशन व विचारमंचचे संयुक्त विद्यमाने साई सभागृह शंकरनगर, नागपुरला संगीतमय स्वरांजली व गोरगरीब अपंगांना जीवनभर चालणारे स्टीलचे कृत्रिम पायाचे वितरण मा. श्री अविनाशजी पांडे खासदार यांचे खासदार निधीतून निःशुल्क वितरित करण्यात आले.

८) रेलवे प्लेटफार्म द्यानमंदिर निवासी शाळा (एन एम सी ची लाल शाळा) लोधीपुरा, बजेरिया नागपुर येथे लायंस क्लब ऑफ कॉसमॉस व विचारमंच यांचे संयुक्त विद्यमाने भारताचे प्रथम पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे मोठी छायाचित्र संस्थेला प्रदान करण्यात येऊन अनाथ विद्यार्थ्यांसोबत चाचा नेहरू जयंतीचा कार्यक्रम १४ नोव्हेम्बर २०१४ ला सम्पन्न झाला.

९) सन २०१४ ला विचारमंच द्वारा ३ विविध कार्यक्रमात हे स्टीलचे मजबूत कृत्रिम पाय ३२ लाभार्थियाना मा. श्री अविनाशजी पांडे, खासदार राज्यसभा यांच्या खासदार निधीतून करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वतः श्री अविनाशजी पांडे, मा. श्री संजयजी देवतळे, माजी मंत्री व श्री श्रीमंत राजे मुधोजी भोंसले यांच्या हस्ते स्टीलचे कृत्रिम पाय वितरीत करण्यात आले.

१०) उत्तराखंड मध्ये झालेल्या अतिवृष्टिमुळे नागपुरातून नागपुर युवक कांग्रेस ह्यांच्याद्वारे औषध, कपडे व इतर आवश्यक साहित्य पाठविण्यात आले. त्यात विचारमंचनी सक्रिय योगदान दिले.

११) विद्यार्थाना बचतीची सवय ह्वावी म्हणून जनरल आवारी विद्यालयाच्या विद्यार्थाना त्यांची वैयक्तिक नावाने आवर्त ठेव व बचत ठेवीची खाते उघडून देण्यात आली व निशुल्क पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.

१२) लोकनेते जनरल मंचरशा आवारी यांचे छायाचित्राचे नागपुर नगर कांग्रेस कमेटित भव्य कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला स्वातंत्र्य संग्राम सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

१३) होम फॉर एज्ड एंड हैंडीकैप संस्था ऊंटखाना, मेडिकल रोड, नागपुर येथील अपंग अनाथ व निराश्रित वृद्धांना नेहमीच भोजनदान करण्यात येते.

१४) नागपुर महापालिके अंतर्गत स्लम विभागातील शाळेच्या विद्यार्थ्यांना कधी गणवेश तर रेनकोट व दप्तराचे वाटपही वेळोवेळी करण्यात येते.

१५) सेवादल शिक्षण संस्था व विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ बुनियादी हायस्कूल येथे स्व. सुलेमानखा पठान गुरूजी स्वातंत्र संग्राम सेनानी ह्यांचा जयंती कार्यक्रम व जनरल आवारी यांचा ४१ वा पुण्यतिथि कार्यक्रम १ जुलै २०१५ ला घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय वडवेट्टीवार आमदार उपस्थित होते. त्याप्रसंगी विचारमंचचे सहसंयोजक डॉ. महादेवराव नगराळे ह्यांनी शासणाच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार २९ दिवसात २०२ गावांना ४०० किलोमीटर (कुही/भिवापुर/उमरेड तालुक्यात) केला. त्याची नोंद ' इंडिया बुक ऑफ़ रेकॉर्ड ' मध्ये झाल्याने त्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला.

१६) सन २०१५ स्व. विट्ठलराव चामट स्मृति सेवा संस्थेद्वारें संचालित विट्ठलराव चामट हायस्कूल दिघोरी येथे विचारमंचच्या वतीने इंडियन डेंटल एसोसिएशन मार्फ़त दंतरोग व निदान शिबिर सम्पन्न झाले. यात ४७१ लाभार्थियाना मार्गदर्शन करण्यात आले.

१७) सन २०१६ गणराज्य दिना निमित्ताने विचारमंच तथा लेबर ठिया संघटनेच्या संयुक्त आयोजित कार्यक्रमात लोकनेता स्व. जनरल मंचरशा आवारी विचारमंच द्वारा उत्कर्ष ब्लाइंड एसोसिएशन, मानेवाड़ा रोड नागपुर येथील १५ अंध मुलीना स्वेटर चे वाटप तथा संचालिका सौ. राधाताई बोरडे यांचा त्यांचे अतुलनीय कार्याबाबत सत्कार मा. श्री गेव्हबाबू आवारी माजी खासदार ह्यांचे स्वहस्ते करण्यात आला.

१८) सेवादल शिक्षण संस्था व विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ बुनियादी हायस्कूल येथे स्व. सुलेमानखा पठान गुरूजी स्वातंत्र संग्राम सेनानी ह्यांचा जयंती तथा जनरल आवारी ह्यांचा ४२ वा पुण्यतिथि कार्यक्रम १ जुलै २०१६ ला घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, कुलगुरु रा. तू. म. नागपुर विद्यापीठ तथा सुप्रसिद्ध निवेदक, कॉर्पोरेट मोटिवेटर तथा लायंस क्लब इंटरनेशनल नागपुर (साउथ) चे भूतपूर्व अध्यक्ष लायन डॉ. मनोज साल्फेकर यांचे विद्यार्थ्यांसाठी परवाना बळ देणारे नवसंजीवनीयुक्त प्रेरक मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंदानी घेतला. त्याची प्रोजेक्टवर संपूर्ण माहिती दिली.

१९) १५ ऑगस्ट २०१६ स्वातंत्रदिनाचे औचित्याने विचारमंच तथा लेबर ठिया संघटनेद्वारे आयोजित कार्यक्रमाला निःशुल्क औषध वितरण तथा मजूरांना टीटयाँनसचे लसीकरण व आरोग्य शिबिर घेण्यात येऊन ३२२ लाभार्थयांनी शिबिराचा लाभ घेतला.

२०) १ ओक्टोबर २०१६ ला आदर्श जेष्ठ नागरिक मित्र मंडल व विचारमंच द्वारा आयोजित जेष्ठ नागरिक दिन तथा पूर्व संधेला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भूतपूर्व पंतप्रधान स्व. लालबहादुर शास्त्री यांना आदरांजली त्यांचे जयंती प्रसंगी देण्यात आली.

Dedicated From:- Shr. Gevbabu M. Avari (Ex-MLA)      Design & Develop By:- Ocean Software Tchnologies